कैफियत मांडणार्‍या तरुणाला पोलिसांनी अडवले

Foto
 वाळूज औद्योगिक वसाहतीतील वसाहतीत एका कंपनीत काम करणार्‍या तरुणाला कंपनीने थेट बारामतीला पाठविले. मात्र तिथे कोणत्याच सुविधा मिळत नसल्याने त्रस्त तरुणाने आज सकाळी पालकमंत्री सुभाष देसाई यांना निवेदन सादर करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सदर तरुणाला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरच रोखल्याने काहीं काळ गोंधळ उडाला होता.
वाळूज येथील एका खाजगी कंपनीत कामाला असलेल्या राजू इंगोले या तरुणाला कंपनी व्यवस्थापनाने थेट बारामतीच्या ब्रांच मध्ये पाठवले. गेल्या दोन वर्षापासून सदर तरुण त्या कंपनीत काम करीत आहे. मात्र कौटुंबिक परिस्थिती आणि कंपनीत सुविधा मिळत नसल्याने आपल्याला पुन्हा औरंगाबाद येथील कंपनीत सामावून घ्यावे अशी मागणी वारंवार व्यवस्थापनाकडे केली. मात्र व्यवस्थापनाने लक्ष दिले नाही, अखेर तरुणाने आपल्या पत्नीसह आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन आरडाओरडा केला. पोलिसांनी सदर तरुणास  अडविले असता पती-पत्नीने रडत आपली कैफियत मांडली.